महाराष्ट्र ग्रामीण

अंबरनाथच्या नाट्यगृहाचा पडदा काही उघडेना

नाट्यरंसिकासमोर अंबरनाथ पालिकेची नाचक्की

अंबरनाथ : अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या ‘द दमयंती दामले’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. मात्र , या प्रयोगादरम्यान, मध्यांतरानंतर नाट्यगृहाचा पडदाचे उघडत नसल्याने प्रयोग अर्धा तास रखडला गेला.

याक्षणी नाट्यगृहात कोणीही टेक्निशियन हजर  नसल्याने कलाकारांनी हाताने पडदा उघडत प्रयोग सुरू केला. संतापजनक असेही समजले पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साउंड सिस्टम मध्येही बिघाड झाला होता. मात्र नाट्यगृहाच्या साउंड टीमने तो त्वरित दुरुस्त करुन नाटक पुढे सुरू ठेवले. आश्चर्य असेही झाले नाटकाचा प्रयोग संपल्यावरही सुभेदार यांनी स्वतःच्या हाताने पडदा बंद केला. मोठ्या गाजावाजा करत उभारलेले नाट्यमंदिर  नाट्यप्रयोगाच्या वेळी साधे टेक्निशियन ठेवता येत नाही का? असा संतप्त सवाल नाटयप्रेमींनी  केला.

 

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button