अंबरनाथ : काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास महात्मा गांधी व मटका चौक सिग्नल जवळच रस्त्याच्या मधोमध असलेले जीवघेणे डिवाइडर याला धडक देऊन काही कार चालक व दुचाकी स्वार यांचा अपघात झाला होता एका चार चाकी वाहनाचे तर प्रचंड नुकसान ही झाले, सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली नाही. हा प्रकार अपघात झाला त्यादिवशी सोशल मीडियाच्या आधारे व्हायरल झाला व वाहतूक प्रशासनाला जाग आली, व्हायरल झालेल्या प्रसंग पाहून PWD चे अधिकारी अनिल पाटील यांनी त्वरित रस्त्यावर विखरलेले डिवाइडर जेसीबी सहाय्याने सरळ रेषेत लावण्यास कर्मचारी वर्गाला पाठवले असता, अंबरनाथ शिवबा ग्रूप चे अध्यक्ष सुमित भालेराव त्वरित उपस्थित राहून विखरलेले डिवाइडर सरळ करण्यापेक्षा ते आपण काढूनच टाकावे अशी विनंती अधिकाऱ्यांना केली, जेणेकरून रात्रीच्या वेळेस पुन्हा असा अपघात होणार नाही, त्यादिवशी चार चाकी वाहन होते, पुढे भविष्यात दुचाकी स्वारची धडक झाल्यास जीवितहानी होऊ शकते असे स्पष्ट मत सुमित भालेराव यांनी व्यक्त केले.
Baba News Ambernath
आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील
Related Articles
Check Also
Close
-
अंबरनाथ मध्ये कमळाला हाताचा आधारJanuary 7, 2026




