आर्थिक घडामोडी

गांवदेवी चौक परिसरात बालाजी नगर परिसराचे प्रवेशद्वार कोसळले

वृत्तपत्र विक्रेते बचावले

अंबरनाथ: गांवदेवी परिसरात बालाजी नगर जाणारे प्रवेशद्वार अचानक भयानक पद्धतीने साधारण दुपारी १.१५ च्या सुमारास कोसळले प्रवेशद्वाराला लागून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे कुंदन जाधव  त्यांच्या पेपर स्टॉलच्या लोखंडी शेड मुळे थडक्यात बचावले,प्रवेशद्वारखाली उभी असलेली कुंदन जाधव यांची दुचाकी MH-05-FS-0245 याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सदैव गजबजलेला गांवदेवी चौक प्रवेशद्वार कोसळत असतांना कोणत्याही वाहनांची व नागरिकांची ये जा झाली नाही हा गांवदेवीचा  आशीर्वाद मानायला हवा असे निष्कर्ष दिसून आले,या सर्व प्रकारची चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नसल्याचे निदर्शनास आले.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button