गांवदेवी खुंटवली परिसरात प्रवेशद्वाराची कमान कोसळली
राजकीय नेत्यांचा आरोप प्रत्यारोप

अंबरनाथ : अंबरनाथ गांवदेवी चौक परिसरात काल बालाजी नगरला जाणारे प्रवेशद्वार (कमान) दुपारी सुमारे १.१५ ते १.३० सुमारास रस्त्यावर कोसळले, झालेला अपघात हा अत्यंत भयावह होता, रविवार सुट्टीचा चा दिवस त्यात गणेशोत्सवामुळे शाळांनाही सुट्या होत्या ,नागरिकांची वर्दळ रस्त्यावरही कमी होती ,कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ही महत्त्वाची बाब,कमानीला लागूनच असलेले वृत्तपत्र विक्रेते कुंदन जाधव हे आपल्या व्यवसायात मग्न होते, कमानीचा कट्ट्याला खेटून आपली कामे करत होते अचानक, विजेचा कडकडाट होतो तसा आवाज कानी आला व क्षणार्धात प्रवेशद्वाराची कमान खाली कोसळली कमानीचे अक्षरशः दोन भाग झाले एक भाग वृत्तपत्र विक्रेते कुंदन जाधव याच्या पेपर स्टॉलच्या दिशेने येत त्यांच्या पेपर स्टॉलला धडक देत कमानीच्या कठड्याला लागला स्टॉलला धडक दिल्याने पेपर स्टॉलचा लोखंडी भाग कुंदन जाधव यांच्या डाव्या बाजूच्या खांद्याला लागल्यामुळे थोडीफार दुखापत आतून झालेली आहे असे निदर्शनास आले, तसेच वृत्तपत्र विक्रेते कुंदन यांची दुचाकी MH.05.FS.0245 याचेही काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. या सर्व अपघाताची चाहूल लागताच अंबरनाथ पोलिस प्रशासन व नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग यांनी त्वरित धाव घेत मोलाची भूमिका बजावली, स्थानिक पातळीचे नगरसेवक यांनीही घटनास्थळी त्वरित धाव घेत झालेल्या घटनेचा पाठपुरावा करून अपघाताचे योग्य निष्कर्ष काढले जाईल, व पुन्हा अंबरनाथ मध्ये अशा प्रकारचे अपघात होणार नाही याची दखल घेतली जाईल, असे आश्वासन प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.


