अखेर सिमरन पाटील आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल
आईच्या तक्रारीवरून भगवान लोटे यांच्याविरोधात गुन्हा

अंबरनाथ : दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी अंबरनाथ बदलापूर हायवे लगत असलेले एस थ्री पार्क हॉटेल रूम नंबर ३१० मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या घटनेची चौकशी चालू असतांना मयत मुलीची आई सौ.रजनी उमेश पाटील यांनी भगवान सुभाष लोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मयत सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉय होती तसेच त्यांच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती , तिची काम सोडण्याची इच्छा देखील होती पण भगवान लोटे यांच्यातर्फे तिच्यावर काम सोडू नये यासाठी दबाव आणला जात होता, तसेच लोटे यांचा मनी लाँड्रिंग हा बेकायदेशीररित्या चालणारा व्यवसाय होता, ह्या व्यवसायाची बऱ्यापैकी माहिती सिमरन पाटील यांना होती, तसेच सिमरन पाटील यांना दबाव तर होताच शिवाय ,मानसिक त्रास ही होत होता , आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले ही होते या सर्व कारणास्तव सिमरन पाटील यांनी आत्महत्या केल्याच निष्पन्न झाले आहे. भगवान लोटे यांचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे याचा तपास अंबरनाथ पोलीस प्रशासन करत आहे.

