अंबरनाथ महावितरण कार्यालयावर जोरदार मोर्चा
स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात जनता रस्त्यावर
अंबरनाथ : महावितरण कार्यालयावर विकास सोमेश्वर यांचा लक्षणीय चर्चेचा विषय बनलेला धडक मोर्चा काढण्यात आला, मोर्चातील विषय गोरगरीब वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरची बळजबरी कशाला, ग्राहकांची संमती असेल तरच आपण स्मार्ट मीटर लाऊ शकता, असे महावितरण अधिकाऱ्यांना विकास सोमेश्वर यांनी ठणकावत, मोर्च्याचे वर्चस्व केले, महावितरण कंपनी अदानीच्या ताटाखालचे मांजर झालेले आहे असा आरोप विकास सोमेश्वर यांनी केला, गोरगरीब ग्राहकांच्या काही तक्रारी असतात त्याचा सुद्धा पाठपुरावा होत नसल्याने सामान्य जनता , महावितरणच्या कारभाराला वैतागलेली आहे असेही सोमेश्वर म्हणाले, यापुढे पूर्णतः अंबरनाथ शहरात कुठेही कोणत्याही विभागात महावितरण स्मार्ट मीटर लावण्याची बळजबरी करत असेल तर आपण, माझ्या कार्यालयात येऊन निसंकोच तक्रार करावी, आम्ही आमच्या पद्धतीने महावितरण अधिकाऱ्यांशी बोलू असेही आश्वासन राहुल सोमेश्वर यांनी ग्वाही दिली. मोर्चा हा कोणत्या पक्षाचा नसून अंबरनाथ मधील सामान्य जनतेचा आहे, लक्षणीय मोर्चेत उपस्थित, पवन वाळेकर, राहुल सोमेश्वर, शैलेश भोईर, चंद्रकात मोटे यांनीही जोरदार प्रदर्शने करत अधिकाऱ्यावर टीका केली, प्रत्येक विभागात स्मार्ट मीटर ची सक्ती होत आहे असे भोईर यांचेही म्हणणे होते. सामान्य गोरगरीब मोर्चाचा सहभागी झालेला विस्तार पाहून महावितरणाचे अधिकारी राजेंद्र भांबरे यांनी जो पर्यंत वीज ग्राहक स्वतःहून स्मार्ट मीटर लावण्यास संमती देणार नाही तो पर्यंत आम्हीही स्मार्ट मीटर लावण्याचा पुढाकार घेणार नाही असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.

