
अंबरनाथ : दिनांक १७ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या माध्यमातून अंबरनाथ मधील वृत्तपत्र विक्रेते बंधू व नगराध्यक्षा सौ. तेजश्रीताई करंजुले पाटील यांच्यात अंबरनाथ येथील वृत्तपत्र विक्रीचे स्टॉलचा विषयी संदर्भात नगराध्यक्षा मॅडम यांना साकडे घातले होते. महिना उलटून गेला तरी अद्याप त्या विषयाचा पाठपुरावा न झाल्याने अंबरनाथ मधील विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहावयास मिळत आहे.
नगराध्यक्षा मॅडम यांनी , ठाणे, मुंबईच्या धर्तीवर प्रशासनाने वृत्तपत्र विक्रीच्या स्टॉल संदर्भात ज्या पद्धतीने G R काढलेले आहेत, त्याचप्रमाणे योग्य पाठपुरावा करून अंबरनाथ मधील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ही समस्या आम्ही मार्गी लाऊ असे आश्वासन दिलेल तर आहेच ,त्याच आश्वासनाची अंमलबजावणी केव्हा होणार या सुनावणीकडे लक्ष एकवटून अंबरनाथ मधील वृत्तपत्र विक्रेते बांधव आजही बसलेले आहेत.

