अंबरनाथ : हॉटेल चालकांची दैना त्यात युद्धामुळे गॅस सिलिंडर चा ९० टक्के तुटवडा उत्सव हॉटेलच्या मेनूकार्ड मध्ये जेमतेम १००/१५० खाण्याचे पदार्थ आहेत हे सर्व वगळून फक्त २५ खाण्याचे पदार्थ ठेवलेले आहेत. असेच चालू राहिले तर अंबरनाथ मध्ये ९० टक्के हॉटेल बंद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सिलेंडर चे रेट गगनाला भिडले तर आहेच शिवाय मार्केट मध्ये कमर्शियल सिलेंडर सुद्धा उपलब्ध नाही, सरकारने वेळीच दखल न घेतल्यास अंबरनाथ मधील हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार हे नक्कीच.


