महाराष्ट्र ग्रामीण

भगवान लोटे यांचा जामीन अर्ज नामंजूर

आरोपीला तात्काळ अटक व्हावी - वाळेकर

अंबरनाथ : मुळात आरोपी हा पक्षाचा नसतो गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो. हॉटेल एस थ्री पार्क १० एप्रिल रोजी घडलेली घटना महिना झाला असतांनाही आरोपी हा अद्याप फरारच आहे. अंबरनाथ पोलिस प्रशासन आपली योग्य कामगिरी बजावत सुद्धा आहे, पण मुळात अडथळा कोणत्या प्रकारे येत आहे अद्याप सिद्ध होत नसल्याने मृतक मुलीचे आईवडील चिंतेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अंबरनाथ पोलिस प्रशासनाने योग्यरित्या पाठपुरावा करून भगवान लोटे यांना बेड्या ठोकल्याच पाहिजे ,पोलिस प्रशासन मोठ मोठे आरोपी पकडतात मग या विषयाला एवढा उशीर का? एका पीडित महिलेवर झालेला अत्याचार , बलात्कार त्यानंतर हत्या असे घडलेले आहे असे राजेंद्र वाळेकर यांचे वैयक्तिक मत आहे.अंबरनाथ पोलिस प्रशासन यांना माझी विनंती आहे आपण योग्य रित्या पाठपुरावा करून मृतक मुलीच्या परिवाराला योग्य न्याय मिळवून द्यावा.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button