महाराष्ट्र ग्रामीण
अंबरनाथ मध्ये पालिका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की !
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल
अंबरनाथ : अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना अंबरनाथ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली. कारवाही सुरू असतांना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एका फळ विक्रेत्यांवर अदाखल पत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवाजी चौक परिसरात फेरीवाल्यांनी पूर्णतः परिसर जाम करून ठेवलेला होता, चाकरमानी यांना कामावर जाण्याची घाई , वाहतूक कोंडी त्यात रस्त्यावर थान मांडून बसलेले फेरीवाले यांच्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागत होता ,ही सर्व बाब लक्षात घेत पालिकेने अतिक्रमणाची कारवाही केली, मुजोर फेरीवाले यांनी सरकारी कामात दखल घेतल्यास कारवाही आणखी तीव्र केली जाईल अशा शब्दांतही पालिका प्रशासनाने बजावले आहे.



