महाराष्ट्र ग्रामीण
अखेर अंबरनाथ पालिकेने अनधिकृत बांधकाम पाडले
नगरसेविका मिनू सिंग यांच्या आमरण उपोषणाला यश
अंबरनाथ : बुवा पाडा परिसरातील अतिक्रमण अखेर पालिका कर्मचारी अधिकारी नरेंद्र संख्ये व कर्मचारी वर्ग यांच्या सहाय्याने जमीनोदस्त करण्यात आले. बुवापाडा या विभागातील अतिक्रमण विरोधात स्थानिक भाजप नगरसेविका मिनू सिंग या तहसील कार्यालया समोर गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते त्यांची एकच मागणी होती, बुवा पाडा परिसरात बांधलेले अतिक्रमण हे बेकायदेशीर आहे हे जमिनोदस्त व्हायलाच हवे हाच मुद्दा घेऊन उपोषणाला बसलेल्या मिनू सिंग यांचा प्रश्न अखेर अंबरनाथ पालिका प्रशासनाने मार्गी लावला. अजूनही परिसरात बेकायदेशीर बांधकाम आहेत, पालिका प्रशासनाने योग्य पाठपुरावा करून मार्गी लावू अशी प्रतिक्रिया अतिक्रमण विभागाचे नरेंद संख्ये यांनी दिली.


