अंबरनाथ नेटक्रिस कंपनी वर कारवाई

अंबरनाथ : कल्याण बदलापूर मार्गावरील विमको नाका एम आय डी सी परिसरातील नेटक्रिस कंपनी वर प्रशासनाने कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात आली असून , संबंधित कंपनीचा परिसर शासनामार्फत सील करण्यात आला आहे. या प्रकरणात औद्योगिक वर्गात मोठी खळबळ उडाली असून, या कारवाही मुळे संबंधित इतर कंपन्याच्या बांधकामांची चौकशी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष बबलू खान यांनी याप्रकरणी १६ सप्टेंबर २०२५ रोजी एम आय डी सी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी सबंधित कंपनीला नोटीस बजावत ७ दिवसात अनधिकृत बांधकाम हटवण्याची सक्त ताकीद दिली होती, त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने जोरदार टीका करत आंदोलनाचा इशारा दिला , अखेर वाढत्या दबावामुळे प्रशासनाने २५ मे रोजी संबंधित कंपनी सील ची कारवाई केली. या कारवाई नंतर बबलू खान यांनी संबंधित अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.




