महाराष्ट्र ग्रामीण

जमलं हो जमलं

अखेर अंबरनाथ मध्ये सेना भाजपा युती

अंबरनाथ : महाराष्ट्र राज्याचे  लाडके उपमुख्यमंत्री, तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार अंबरनाथ मध्ये शिवसेना भाजपा युती अखेर झाली. राज्यात युती, केंद्रात युती इतर राज्यात ही शहराच्या विकासासाठी स्थानिक पक्षाची भाजप सोबत युती ही आहेच, तसेच अंबरनाथ मध्ये पाहिले असता जो मतदार  राजा आहे तो युतीचाच आहे ,ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भविष्यात होणारे अंबरनाथ शहराचे विकासाचे मुद्दे , तसेच अंबरनाथ मध्ये भाजपा व शिवसेनेकडून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत, ही बाब लक्षात घेऊन अंबरनाथ मध्ये शिवसेना भाजपा यांनी युती केलेली आहे. याबाबतीत कोणत्याही प्रकारचा संदेह नाही, अंबरनाथचा भविष्यात उज्वल विकासासाठी झालेल्या युतीत कोणत्याही प्रकारचा किंतू,परंतु राहिलेला नाही असे स्पष्ट मत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी व्यक्त केले.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button