आर्थिक घडामोडी

रात्रीचा दिवस करणारे एकमेब नगरसेवक विकास सोमेश्वर

पोलिस प्रशासन मटका चालकांच्या पाठीशी

अंबरनाथ : अंबरनाथ स्टेशन परिसरातील प्रीती हॉटेल व जयशंकर स्वीट या हॉटेलच्या मागील परिसरात, मुख्य रिक्षा स्टँड लगतच बेकायदेशीर रित्या मटक्याचे व्यवसाय सुरू आहे असा विषय नगरसेवक विकास सोमेश्वर पालिकेच्या सभागृहात मांडत अंबरनाथ पश्चिम पोलिस स्टेशन व शिवाजी नगर पोलिस स्टेशन यांनाही अर्जाद्वारे पूर्व सूचना दिल्या होत्या वेळीच पोलिस प्रशासनामार्फत पाठपुरावा न झाल्याने वेळेची भान न ठेवता नगरसेवक विकास सोमेश्वर रात्री स्वतः ११ वाजता बेकायदेशीर रित्या मटक्याचे व्यवसाय चालू असलेला अंबरनाथ स्टेशन परिसरात पोहोचले , व त्याठिकाणाहून अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात रात्र पाळीत कार्यरत असलेले सिनियर हेड यांना फोन केला, त्वरित सिनियर व त्याची टीम स्टेशन परिसरात दाखल झाली, विकास सोमेश्वर यांचा पहिला प्रश्न असा होता या विभागात मटक्याचे व्यवसाय आहे का नाही,ब्रिट मार्शल घेऊन फिरणारे तुम्हाला ब्रिट मार्शलचा अर्थ काय , हा प्रश्न करत सरळ सरळ पोलिस प्रशासन मटका व्यावसायिकांची पाठराखण करत आहे असा आरोप नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी पोलिस प्रशासनावर केला . पोलिस प्रशासनाला या विषयाची पूर्ण माहिती आहे मग कारवाही करणार केव्हा मी एक नगरसेवक तुम्हाला फोन केला तुम्ही १ तासांनी आला मग कोणत्या सामान्य जनतेने फोन केल्यास तुम्ही माणूस मेल्यावर येणार का अशा शब्दात विकास सोमेश्वर यांनी पोलिस प्रशासनाची विचासारणी केली.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button