वृत्तपत्र विक्रेते राजू क्षीरसागर यांची मुलगी झाली CA

कल्याण : कल्याण विभागातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते राजू क्षीरसागर व पत्नी श्वेता क्षीरसागर यांची मुलगी इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट्ड अकाउंट असोसिएशन तर्फे झालेल्या परीक्षेत प्रथम केलेल्या प्रयत्नातचे पास होऊन कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल लतिका क्षीरसागर यांना विविध वृत्तपत्र क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
राजू क्षीरसागर गेली ४५ वर्षापासून सहजानंद चौक कल्याण येथे आपला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय नित्यनेमाने करत आपल्या परिवाराचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपल्या वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातुनच केला, हीच मोठी बाब, राजू क्षीरसागर यांची वृत्तपत्र विकून केलेली मेहनत व मुलांची अभ्यासात असलेली चिकाटी मुळात,यामागील मुख्य उद्देश म्हणून आज मोठ्या तोऱ्यात सोशल मीडियावर बातमी पसरत आहे वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी झाली CA खरच डोळ्यात आनंदी अश्रू येतील अशी कामगिरी कल्याण मधील वृत्तपत्र विक्रेते राजू क्षीरसागर यांची कन्या लतिका यांनी केलेली आहे.



