उल्हासनगर : मंचुरियन मध्ये आढळले पालीचे मेलेल पिल्लू , मंचुरियन खाऊन तरुणीची तब्येत बिघडलेली घटना समोर आली आहे, तरुणीवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून , उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरात राहणारी मीना पाठारे तरुणीचे नाव आहे,

सायंकाळच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरात मोरे चायनीज ह्या दुकानातून खाण्यासाठी मंचुरियन घरी आणले असतांना मंचुरियन मध्ये पालीचे मेलेले पिल्लू निदर्शनास आले , लगेचच, मीना पाठारे यांनी मंचुरियन विक्रेता मोरे यांना कळवले असता मोरे यांनी मी टेस्टिंग साठी पाठवतो असे तरुणीला सांगितले व तू सुद्धा या प्रकरणी कोणालाही सांगू नको असे सांगितले, ही सबब ची बाब नागरिकांच्या जीवाशी खेळणारी असून पालिका प्रशासनाने चायनिज भेळ, व मंचुरियनच्या हातगाड्यावर कारवाही करण्याची काळाची गरज आहे.




