महाराष्ट्र ग्रामीण

चक्क पोलिसांच्या नावाने ज्वेलर्स व्यापाऱ्यांकडून खंडणी

पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

अंबरनाथ : अंबरनाथ पोलिस प्रशासना तर्फे एक कौतुकास्पद कामगिरी पार पडली. अंबरनाथ ज्वेलर्स व्यापाऱ्यांकडून आम्ही पोलिस अधिकारी आहोत असे व्यापाऱ्याला सांगून पाच लाखा रुपयाच्या खंडणीचा गुन्हा समोर आला, फिर्यादी उत्तम कुमार प्रजापती राहणार पश्चिम यांनी तक्रार अर्ज दाखल करत दुकानाचे काही सीसीटीव्ही फुटेज, व चौकशी करून अंबरनाथ मधील दोन इसम यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सबब च्या इसमा दरम्यान काल रात्री एका पान टपरी चालकाला गुटखा विक्रीच्या कारणावरून त्याला धमकी देत FDA कडे तक्रार करेन अशी पान टपरी चालकास धमकी देत त्याच्याजवळून सात हजार रुपये रोख घेतल्याची तक्रार देखील निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगाने आरोपींवर एक वेगळा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले , व अंबरनाथ पोलीस प्रशासनाने  आरोपींची चौकशी,पोलिस कोठडी रिमांड साठी न्यायालयात मागणी केली, आतापर्यंत आरोपींवर तब्बल तीन गुन्हे दाखल झाले आहेत. प्रथम गुन्हा बिल्डर व्यवसायाकडून खंडणीची मागणी केलेली होती. सदर चे आरोपी संजय प्रसाद व तेजस सरवदे हे आरोपींची नावे आहेत.

Baba News Ambernath

आमच्या येथे सर्व प्रकारच्या जाहिराती , बातम्या स्वीकारल्या जातील तसेच वृत्तपत्र व मासिके मिळतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button