अंबरनाथ : दरवर्षी महात्मा गांधी विद्यालय या शाळेचा वेग वेगळे उपक्रम राबवत असते त्यातीलच रक्षाबंधन निमित्त ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम आज शालेय विद्यार्थिनींनी राबविला, या उपक्रमामध्ये इयत्ता ५ वी ते सातवी मधील विद्यार्थी यांनी जवळ जवळ १६ हजार राख्या तयार केल्या व त्या राख्या भारतीय सैनिकांना पाठवल्या, सोबतच एक पत्र लिहिले व सैनिका प्रति असलेल्या भावना व्यक्त त्या पत्रात व्यक्त केल्या. तसेच बनविलेल्या काही राख्या स्थानिक ,पोलिस काका, रिक्षावाले काका, भाजीवाले काका, तसेच घरोघरी जाऊन राख्या विकल्या त्यामुळे विक्री कौशल्य काय असते, व्यवहाराचे संवाद कौशल्य कसे असते हे समजले, एक राखी सैनिकांसाठी हा महात्मा गांधी विद्यालयाचा अनोखा उपक्रम खरच एक कौतुकास्पद ठरलेला आहे, जेव्हा ह्या राख्या व विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र सैनिकापर्यंत पोहोचेल तेव्हा खरच भारतीय सैनिकही गहिवरून येत असेल, माझीही बहिण विद्यार्थिनी आठवणीने हे पत्र व राखी पाठवत असते, सैनिकांनाही राखी हातावर बांधताना असे वाटत तर असेलच की देशवासीय आपल्या सोबतच आहे आपण एकटे नाही, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक वर्ग यांनी केले.



